चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी

Started by sachinikam, May 28, 2015, 11:59:23 AM

Previous topic - Next topic

sachinikam

चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी

चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी,
तरंगला नि:श्वास, पाहून तिची छबी,
गार गार झुळूक, अशी झोंबली कशी,
डोलते मन हर्षाने, नौका झुलते जशी,
चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी ।। धृ ।।


बरसल्या प्रीतधारा, भिजले सर्वांग चिंब
पहिले मी तिच्याच नयनी, माझेच ते प्रतिबिंब
झंकारले प्रणयसूर, प्रेमाच्या आरंभी
कल्पतरुला ग साजने, अंकुरली पारंबी
चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी ।। १ ।।

...
चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी ।। २ ।।

भाळलो पाहून रूप सये आरसपाणी
ये जवळी अजुनी अशी, दे हात हातात राणी
बेधुंद झाल्या साऱ्या दिशा, हवा ही शराबी
झाले ईश्क मजला राणी, अदा ती लाजवाबी
चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी ।। ३ ।।

गीतकार : सचिन निकम
कवितासंग्रह : मुग्धमन
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com


sachinikam

चंद्रमा नभी आणि ती जवळ उभी


मिलिंद कुंभारे