छत्री असून सुद्धा बावळट भिजत होते……

Started by शितल, May 30, 2015, 01:13:20 PM

Previous topic - Next topic

शितल

ती दोघे डोंगरावरती,
ढगांची त्यात होती भरती,
काळोख चांगला दाट होता,
भिजण्याचा त्यांचा मूड होता,

गार वारा झोंबू लागला,
टीपक्यांचा वर्षाव सुरु झाला,
त्यांच्या डोळ्यात मधाळ नशा होती,
एकमेकांच्या मिठीत शिरण्याची आशा होती ...

प्रत्येक थेंब ठिणगी सारखा वाटू लागला,
त्यांच्या तारुण्यात भर घालू लागला,
एकमेकांचा स्पर्श जाणवत होता,
तो क्षणोक्षणी तिला लाजवत होता....

त्याच्या अंगात वीज उतरली होती,
तिला मात्र थंडी वाजत होती
लपून-छपून त्यांचे हे खेळ चालू होते,
छत्री असून सुद्धा बावळट भिजत होते......


शितल......