''आज मला चिंब होऊन भिजायचय'' ………

Started by शितल, June 07, 2015, 01:14:30 PM

Previous topic - Next topic

शितल

(आज थोडा गारवा होता हवेमध्ये, हलका हलका पाऊसही टिमटीमायला लागला.  मन खूप शांत होतं, त्याच्या आठवणी नाही, दुःख नाही.
मनाच्या खूप खोलवर जाऊन पाहिलं आज काहीच वाटत नव्हत. आणि त्याच शांततेतून उमगली हि कविता ......) :) :) :)

जुन्या आठवणींना कुशीत सामवून
डोळ्यांमधे आशा जागवुन
पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला हर्षाने झेलायचंय ...
आज मला खरंच भिजायचय..........

भान सारे हरपून जातील
दुखः सारे संपून जातील
या गार वाऱ्याच्या स्पर्शाने
ओंझळीत अश्रू सांडतील
या भरलेल्या हृदयाला निथळायचय......
आज मला चिंब होऊन भिजायचय .........

शितल .......



शितल


कवि - विजय सुर्यवंशी.