प्रवास आठवणींचा

Started by Shirish Edekar, June 09, 2015, 12:56:25 PM

Previous topic - Next topic

Shirish Edekar

प्रवास आठवणींचा...
"आठवणी"
सुखावतात, तर कधी दुखावतातसुध्दा,
"आठवणी"
मनात घर करून रहाव्याशा वाटतात,
तर कधी त्या उगाचच रेंगाळत राहतात,
"आठवणी"
हव्या हव्याशा वाटतात,
तर कधी कितीही विसरावस वाटल,
तरी त्या गोचडीसारख्या चिकटून बसतात,
"आठवणी"
कधी ओठावर हसू आणतात,
तर कधी डोळ्यात अश्रू...
"आठवणी"
कधी गर्दीत मनाला एकट करतात,
तर कधी एकट असताना मनात गर्दी करतात,
"आठवणी"
बालपणाच्या : बावनकशी सोन्यासारख्या,
"आठवणी"
शाळेतील संस्काराच्या : पाटीवरच्या रेघोट्या पुसल्या जाऊ शकतात,
पण ज्या मनात कोरल्या जातात त्या कधीही न पुसल्या जाण्यासाठी,
"आठवणी"
तारुण्याच्या : मनाच्या कोपऱ्यात लॉक करून ठेवलेली सुगंधी कुपी,
ज्या ज्या वेळी ती उघडावी, त्या त्या वेळी तिचा गंध वेगळा,
"आठवणी"
आयुष्याच्या मध्यानीच्या : जगतो जीवन भूतकाळातील आठवणींवर,
कधीही न संपणाऱ्या या प्रवासात शेवटपर्यंत संगत असते ती....
"आठवणींचीच"
कारण हिशोब द्यावा लागतो, यमराजाला.....
पाप-पुण्याबरोबर, बऱ्या-वाईट आठवणीचा....
शिरीष येडेकर.