पाल..

Started by विक्रांत, June 10, 2015, 09:58:24 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


चिवटपणे जगते पाल
भिंतीवरती तग धरत 
तिजला माहित फक्त
बसणे जागा सांभाळत

किडे मुंग्या झुरळ
सारे खात पटापट
दबा धरत संधी साधत
उदराचा खड्डा भरत

इवल्याश्या भिंतीची
इवली सरहद्द असे
कोपऱ्यात सांदीमध्ये
युद्ध घमासम दिसे

ट्यूब खाली गरमीने
जीवाला आराम पडे
वायरीच्या छिद्रामध्ये
अन नवा जीव घडे

कधी कधी मोहापायी
जीवावर वेळ येते
सोडून साठली शेपूट
मग मरण चुकते

लाखो वर्ष झाली तरी
घुसखोर घरातली
लळा तर सोडाच पण
मैत्रीन ही नाही झाली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in