विचार कर माझा …!

Started by AKSHAY BHALGAT, June 12, 2015, 03:04:08 PM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

तु म्हणत असतेस " मी " मित्र आहे तुझा ....!
पण एकदातरी ... विचार करून बघ माझा ... !

सगळ माहितीये तुला , तरी लय नाटक करते ...!
का कोणास ठाऊक ., पण इतका भाव खाते ...!
कळलाय तुझा ATTITUDE ... बास झाली ना सजा ...।
आता एकदा तरी स्वताहून ., विचार कर माझा ...!

एकदा मनापासून -  " हो " म्हणून तर बघ ,
गवसेल तुलाही ., तुझ्या स्वप्नातलं जग ...!
" हो " म्हणण्यातच बघ, किती असते मज्जा ....
फक्त एकदा मनापासून ., विचार कर माझा ...!

नको करू काळजी ., असेन ना मी " सोबती " ...!
दुःख हि नाही दरवळणार ., तुझ्या अवती-भवति ...!
सुखाचेच क्षण असतील तुला मोजण्या ...!
त्यासाठी एकदा तरी ., विचार कर माझा ...!

माझ काय " हो " आहे , पण तुझाच निर्णय अंतिम असेल ...
खरच सांगायचं तर ..., आपलीच जोडी सुंदर दिसेल ...!
काहीही ठरवलस तरीही , शेवटी मित्र असेनच तुझा ...।
पण जर personally सांगतो ....,
एकदा तरी ... विचार करून बघ माझा ... !
एकदा तरी ... विचार करून बघ माझा ... !

अक्षय भळगट
१२.०६.२०१५