चारोळ्या~ बिरोळ्या -7

Started by Rajesh khakre, June 12, 2015, 06:21:55 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

पाऊस !!!

पावसाशी नाते माझे
कसे जन्म जन्मांतरीचे
त्याचे येणे माझे खुलणे
जणू माहेर पणाचे

पाऊस आला कितिकदा
अजून जूना झाला नाही
असे कधीच नाही झाले
मन ताजे झाले नाही

तुझ्या पाण्यात पावसा
भिजली काया कितिकदा
नाही आठवण झाली ओली
ना कळली मनाची खोली

मन माझे रिते रिते
तुझ्या पाण्याने भरले
तुझ्या सवे जगताना
माझे बालपण सरले

तुझे टप टप थेंब
मज उभारी ते देते
मरगळल्या मनाला
नवपल्लवित करते

तुझ्याच साक्षीने मनात
कितिक आठवणी जपल्या
तुझ्या एकाच थेंबाने
मनावर अलगद टपकल्या

तुझे आभार पावसा
सांग मी ते कसे मानू
तुझ्यावाचून जगण्याला
जगणे ते कसे म्हणू
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com