कुशित मला तुझ्या आज घे ना ग आई...!

Started by Archana...!, June 13, 2015, 02:10:39 AM

Previous topic - Next topic

Archana...!

लढून स्वत:शी, आज थकून मी गेले...
आस उरली न काही, जग सुने सुने झाले...
का ग दाटले हे धुके, मन का ग वेडे पिसे...
काही दूरावते आहे, खूप रडावेसे वाटे...
आसू ते पुसाया, तू ये ना ग आई...!

कुशित मला तुझ्या आज घे ना ग आई...!

आठवती आज, ते बालपणीचे दिवस...
माझी उनाड ती मस्ती, तुझे मायेचे धपाटे...
जरी चुकले कधी ग, तु सांभाळून घेशी...
आज चुकांची ग, शिक्षा नातं तोडूनंच देती...
का ग मनाचे पाखरू आज दिशाहीन होई...
तुझ्या पंखांची ती ऊब आज देशिल ना ग आई...!

कुशित मला तुझ्या आज घे ना ग आई...!

कळली न मला, या जगाची ही रीत...
खोटपण जिथे, चाले रूबाबात...
सत्याची किंमत, इथे कुणास न वाटे..
खोट्या या जगाची, आज भीती मनी दाटे...
सारे तोडूनिया बंध, जीव मुक्त होऊ पाही...
जग विसरले मला, आस तुझी ग उरली...
तुझ्या घट्ट त्या मिठीची आज ओढ ग लागली...!

कुशित मला तुझ्या आज घे ना ग आई...!

क्षण ते सुखाचे, कसे सरूनिया गेले...
जीव गुंतला ज्याच्यात, तोच दूर आज आहे...
हसु तुझ्या सोनुलीचे, कसा घेऊन तो गेला...
पाहूणा तो आता, क्षणा-क्षणांचा ग झाला...
स्वप्नांतच आता, त्याला भेटायचे आहे..
सारे विसरूनी दु:ख, गाढ निजायचे आहे...
अंगाई ती आज, तू गा ना ग आई...!

कुशित मला तुझ्या आज घे ना ग आई...!


अर्चना...!