शेतकरी

Started by Ravi kamble, June 13, 2015, 10:22:13 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

शेतकऱ्याची जात आमची
कसण्यात अन मसणातच गेली
कळल का आमच दुःख कोणा
का वाचनात अन वचनातच गेली

आधीच कर्ज सावकारिच
त्यात अवकाळीन केला कहर
खता ऐवजी जाहिर करा
मोफत आमच्या साठी जहर

घर गहाण बँकेकड
बैला सकट नांगर ठेवला
आम्हीच पिकवुन उपाशी
न खायला काही निवाला

पोराला देताना पोरगी
शेतकऱ्याचा हाय नाय मिळणार
आमच्या पोरी घेताना तोळा हुंडा
अन एकरा सकट मागणार

शेती प्रधान देश आमचा
जगास मिरवुन सांगणार
शेतकऱ्यांच्या आत्महत्या
तुम्ही सांगा कधी रोखणार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या
तुम्ही सांगा कधी रोखणार

(रविंद्र कांबळे,पुणे 9970291212)