एक जिवंत आंबेडकर होणे नाही

Started by Maha Ravindassa, June 24, 2015, 11:31:05 AM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa

इतिहास तुझा ज्वलंत होता ज्वालामुखी  त्या धरणीच्या गाभाऱ्यातील
मानवाला मानव करून गेलास तुला देव केला रे इथल्या मंदिरातील
नेक तुझा बाणा आता इथे दिसतच नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही  ।। धृ ।।
कसा केला माणूस तुला बघ एकदा त्या इतिहासात
अनेक जीवघेणे प्रसंग आले रे बाबासाहेबांच्या जीवनात
नाही भ्याले कोणाच्या धमकीला निस्वार्थ होता मनात   
स्वाभिमानच वादळ भीमान उभ केल समजात
हेतू भीमाचा कधी त्याच्या लेकराला समजलाच नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही  ।।१ ।।
काय होता तो चवदार तळ्यांचा संघर्ष केला केवळ मानवासाठी
हक्क निसर्गाने दिले ते परत मिळवण्यासाठी
उभे केले समाजाला त्याचे हक्क मागण्यासाठी
केला कठोर परिश्रम तुमच्या पायातील गुलामीची बेडी तोडण्यासाठी
पण अजून आम्ही काही आमची गुलामी सोडलेली नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही  ।। २ ।।
अतिपरिश्रमाने  देह मात्र थकला अपार यातना साहून
रक्ताच्या करून पाणी भीमाने जीवन तुमचे दिले ना नटवून
अधिकार तुम्हाला आज मिळाले केवळ लिहिली घटना म्हणून
नसती लिहिली घटना बाबांनी मेला असता आज बेवारस होवून
तरी देखील आम्ही मोल भीमाचे कधी जाणलेच नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही  ।। ३ ।।
गळ्यात मडके कमरेला झाडू अशी परिस्थिती आमची होती
३३ कोटींनी कधी नाही पहिले हो आम्ही राहिली भूकेपोटी
शिक्षण घ्यावे कसे कारण घाबरत होतो  आम्ही याच ३३ कोटींच्या भीती पोटी
उद्धार केला भीमाने आमचा गाडून हे सारे ३३ कोटी
तरी देखील आमचा देव काही आमच्याकडून सुटत नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही ।। ४ ।।
बुद्ध दिला  बाबासाहेबांनी अतिशय अभ्यास करून
म्हटले मानवी जीवनाचा कल्याण केवळ आहे बुद्धाच्या शिकवणी मधून
२२ प्रतिज्ञा दिल्या कर्मकांड सोडावे म्हनुन
सांगितले बुद्ध तत्व स्वीकारा स्वतः आत्मसात करून
पण काय करणार अजून आम्हाला बुद्ध उमगलाच नाही
खर सांगतो बाबा पुन्हा एक जिवंत आंबेडकर  होणे नाही ।। ५ ।।

भिमरत्न सावंत

shinde avinash