सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी

Started by Maha Ravindassa, June 24, 2015, 11:34:00 AM

Previous topic - Next topic

Maha Ravindassa


का रे नेभलट आहात का तुम्ही कि पराक्रम गंजलाय तुमचा
तुमच्या डोळ्या देखत खून करतात पुरोगामी माणसाचा
असे त्यांचे जीवन काय व्यर्थ का घालवतोय आम्ही
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। धृ ।।
मागे अशीच घटना घडली पुण्याच्या त्या शहरात
दाभोलकर मारले बघा त्यांनी चार चौघात
अजून पत्ता नाही मारेकऱ्यांचा आम्ही मात्र अजून शोधात
सरकार हिंदूंचे जमेल कसे त्यांना जाने त्यांच्याच विरोधात
अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून लढला हा पुरोगामी
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। १ ।।
कालच पानसरे यांचे जीवन कार्य संपवले
आक्रोश देत जनतेचे लोंढे हि आले
उद्या परवा चार दिवस असेच आंदोलन चाललेले
नंतर मात्र सर्व शांत निपचित पाडलेले
सांगतो हाच शिवाजी कोण होता तो पुरोगामी
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। २ ।।
मारतात आजला पुरोगामी कशाच्या जीवावर
खून करतात भडवे साले कोणाच्या जीवावर
इथल्या मातीला रक्ताचा अभिषेक करता कशासाठी
मायभूमी आमची आमच्याच लोकांच्या रक्ताने पावन करता कोणासाठी
धर्म तुमचा आधीच विकृत आणि त्या धर्माचे चेले विकृत साले तुम्ही
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। ३ ।।
लढतो आहे झगडतो आहे इथल्या मातीत
पुरोगामी विचारांचा झेंडा रोवतो आहे इथल्या धरणीत
प्रतिगामी विचारांवर महापुरुषांचा मानवतावादाचा दणका
हिंदुत्ववाद्यांच्या मोडतोय आजला पाठीचा मणका
प्रतिगामी शक्ती तुमची आजवर तुमच्यावर भारी हा पुरोगामी
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। ४ ।।
याच मातीत बुद्ध झाले याच मातीत कबीर
सह्याद्रीचा सिंह गरजला गर्जला शिवराय तो खंबीर
फुले शाहू राजांच्या क्रांतिकारी विचारावर
अरे इथल्या कणाकणात मनामनात जन्म घेतोय आंबेडकर
यांच्या विचाराच्या पुढे काय चालणार तुमची प्रतिगामी
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। ५ ।।
न स्वार्थासाठी ना आपल्या घरासाठी
पुरोगामी नेहमीच लढला इथल्या समाजासाठी
जान असू द्या या मातीची जिने घडवले असले विचारवंत
दाभोलकर पानसरे मारले तुम्ही पण त्यांचे विचार आज हि आहेत इथे प्रतिभावंत
नका ललकारू इथल्या वाघांना नेस्तनाभूत करू आम्ही
सांगा ना कोनासाठी लढतो हा पुरोगामी ।। ६ ।।
भिमरत्न  सावंत