क्षणीक खेळ ...

Started by Mayur Dhobale, June 26, 2015, 12:34:23 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

नको नकोस झालं सारं...
उगा घोंगावतय निर्जीव वारं...
डोक्यावरती प्रचंड भारं,
या सारयात हृदयालाच मारं..

क्षणीकच असतात खेळ सारे,
मग खेळायच तरी कशाला?
पण मग जगाव तरी कस?
नुसत्याच घेऊन आठवणी उशाला...
कळेनाच झालं खुळ्या मनाला ,
जगण्याचा सारं ....

रात्र  आहेच  नशिबी  मग ,
दिवसाच ढोंग तरी कशाला ?
तहान भागते आज तरी ,
उद्या कोरड आहे घशाला...
मग नेमकं आज जगाव की उद्यात???
या प्रश्णालाही केवढी धारं....

म्हणतात म्हणनारे जिंदगी छान आहे ,
हो पण किती लहान आहे ...
त्यातही मान आहे जोडीला अपमान आहे ...
कळतही नाही कधी निसटते...
जिवानाची  दोर ......
नको नकोस झालं सारं...
उगा घोंगावतय निर्जीव वारं...
डोक्यावरती प्रचंड भारं,
या सारयात हृदयालाच मारं.. 

  --   Mayur Dhobale ( fb page 'mazi kavita)