चारोळ्या~बिरोळ्या-11

Started by Rajesh khakre, June 28, 2015, 08:52:27 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

विश्वास..!

एकदा विश्वास उडाला की
पुन्हा ठेवावा वाटत नाही
विश्वासघात करणाऱ्याला
त्याचे काहीच वाटत नाही

विश्वास असतो धागा
नाजूक मानवी नात्याचा
जसा दोरा गुंफतों
हार एकत्र फुलांचा

एकदा अंधारात ठेऊन
कुणालाही फसवता येते
माणसाची लायकी मात्र
त्यातुन दिसून येते

प्रेम,आपुलकी,जिव्हाळा
विश्वासावर टिकून राहते
विश्वासाला तडा जाताच
सर्वकाही सुकून जाते

स्वार्थासाठी माणसे कधी
विश्वासाचा ही बळी घेतात
मानव्याची तोडून लक्तरे
माणूस म्हणून मिरवतात
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

(माझ्या कविता इमेज format मध्ये मिळवण्यासाठी whatsapp विनंती पाठवा)