एक खंत.......!!!

Started by Rajesh khakre, July 04, 2015, 07:44:36 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

एक खंत...!

प्रिय कवी व कविता वाचक मित्रांनो,
आपण सर्वजण कवितेवर प्रेम करणारे आहोत.
कविता ही ह्रदय आणि मनातल्या भावना व्यक्त करते.
कविता लिहण्यासाठी जसा मनाचा निर्मळपणा हवा तसाच कविता वाचण्यासाठी ही असला पाहिजे.
तोच व्यक्ति कवितेवर प्रेम करु शकतो जो मनाने निर्मळ व प्रामाणिक आहे.कारण कविता हृदयातून निघते व वाचकाच्या हृदयापर्यन्त पोचते.
कवि प्रसिद्धि मिळण्यासाठी कधी कविता लिहत नाही.कवी जेव्हा कविता लिहतो तेव्हा त्याच्या हृदयाला एक अपरिमित आनंद मिळत असतो.तसाच तो इतरांना मिळावा यासाठी तो वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या कविता प्रसिद्ध करत असतो.
त्याचा हेतू प्रामाणिकच असतो.
आता जेव्हा वाचक म्हणून एखाद्या कविचि कविता आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला ती आवडली की आम्हाला ती whatsapp ,Facebook ,या सारख्या social media किंवा इतरत्र फॉरवर्ड करण्याचा मोह होतो.पण त्यावेळी आम्ही ही गोष्ट विसरतो की ही कविता एक कलाकृति आहे.एखाद्या कविचि बौद्धिक संपदा आहे.
आणि वाचक म्हणून प्रामाणिकपने कविच्या नावासहीत कविता forward करने आवश्यक असताना आपन ते करत नाही.
म्हणजेच वाचक म्हणून आपली भूमिका आपण पार विसरून जातो.
आणि माझ्यासह सर्व कविमित्रांचा हा अनुभव आहे.
     आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो ज्याच्याजवळ हा मनाचा मोठेपणा नसेल ना खात्री बाळगा तो व्यक्ति कधी कवितेवर प्रेम करु शकत नाही.
कुणाला माझ्या म्हणण्याचा राग आला तर मला माफ़ करा मित्रांनो!!!
थोडा मनाचा मोठपणा दाखवा....कवितेवर प्रेम करा...कविता जगा....आनंद घ्या....
धन्यवाद मित्रांनो
~आपला
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com