कशाला जाता पंढरी अन

Started by Vikas Vilas Deo, July 05, 2015, 10:30:23 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

कशाला जाता पंढरी अन काशी

कशाला जाता पंढरी अन काशी
सर्व दैवत आईच्या चरणापाशी

तीर्थस्नांनासाठी हिंडता ठायी ठायी
त्या नद्यांचा उगम आईच्या चरणापायी
पुण्य कामावेण्या देवळात जाई
त्या पुण्याची गठडी असे आईपाशी
      कशाला जाता पंढरी अन काशी

आई सेवेची पुण्याई सर्व जागा असे मान्य
आई सेवेहून जगामध्ये असे कोणते मोठे पुण्य
आईच्या सेवेने होशील रे धन्य
मग कशाला पाळता एकादशी राहता उपाशी
      कशाला जाता पंढरी अन काशी

ज्या ईश्वराने शोधतो देशातून दाही
तोच ईश्वर आईच्या हृदयात राही
त्यासी मानव दगडात पाही
मानव अशी मूर्ख झाले काशी
      कशाला जाता पंढरी अन