मनाच आभाळ

Started by Mangesh Kocharekar, July 26, 2015, 01:05:50 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

मनाच आभाळ भरून येत आणि डोळे गळू लागतात
आनंद असो वा दु:ख खरच काहीच नसत आपल्या हातात
  कधी होतो मनाचा कोंडमारा अन दाटून येत र्हीदयात
  नकळत खचूनच जातो धीर सार अंगच भिजत घामात
कधी पेटतात धमन्या उष्ण होतो श्वास जणू लाव्हा रक्तात
कधी मन भयभीत, अन आशंकित मग अश्रूच गोठून जातात
   कधी मन नितळ आभाळ कल्पनेचा मयूर उडे नभात
   कुठेही ते स्वैर नाचे आनंदे, अवघे स्वप्नच घेई डोळ्यात
कधी मन होत शांत आश्वस्त त्याची स्व क्षमतेवर भिस्त
चेहऱ्यावर एक अनोख तेज जणू सार विश्वच त्याच्या हातात
   कधी मन  कावर –बावर स्वकीयासाठी येई प्राणच कंठात
   अन कानी पडता ओळखीची शिळ ते झुलते रस्त्यातच तालात
मन थोड हट्टी होत रुसण रागावण त्याला चांगल जमत
लटक्याच रागाने अबोल होत, त्यालाही ते वेठीस धरत
  त्याच मन अपराध्याच, स्वारी म्हणत डोळ्यात पाहात
  मनधरणीच्या शब्दाआड, हळव मन मग मिठीत शिरत
मनास आता सुखाचा पूर ,जणू काही वेळापुर्विचाअबोला कोसो दूर
मन हेलकावत,सुखात न्हात, स्वतःला करून घेत पुरत रीत