-- दुःख --

Started by SHASHIKANT SHANDILE, July 27, 2015, 11:59:04 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

दुःख म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समझण्यापलिकडचं आहे. सर्वांना आपले दुःख मोठे वाटताच, यात मात्र शंका नाही. "अपयश, निराशा, त्रास आणि जीवनातील असहनीय क्षण म्हणजे दुःख आहे का?" कदाचित, इथे सर्वांनाच दुखाच्या क्षणातून सामोरा जावं लागतं, यात नवीन असं काहीच नाही. "सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचे दोन भाग आहे" हे वाक्य आपन अनेकदा ऐकतो पण तरी सुद्धा आपल्याला दुःख हे मोठंच वाटतं. सुखाचे दिवस लवकर कटतात आणि दुःखाचे क्षण वर्षागत वाटतात हे खरं पण दोघांचा कालावधि सारखाच. "दुखाच्या यातनेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न माणसाने सदैवं करावा" हा उपदेश आपन अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो पण ते शक्य होत नाही. काही दुःख क्षणभंगुर असतात काही निरंतर त्रास देणारे. अश्या सतत होणाऱ्या दुखातून बाहेर निघने अशक्य असेलहि पण आज यावर उपाय म्हणून आपन "आत्महत्येची गोळी" खातो पण आत्महत्या ही दुखाच्या रोगांची गोळी नाही. आत्महत्या तुमच्या दुखाचे निवारण कदाचित करत असेलहि पण आपल्या आत्महत्या केल्याने दुसऱ्यांच्या दुःखात भर पडणार आहे, हे विसरायला नको. घरच्या दहा लोकांना दुखी करण्यापेक्षा आपन एक दुखी असलेलो बरे नाही का? दहा रडणाऱ्यांपेक्षा आपन एक रडलेलो बरे नाही का? या जीवनात जगुण पाहा, या जीवनाचा अंत पाहा, पाहा की, आपलं जीवन आपल्यावर किती अन्याय करतो.
"अर्धवट मरून काय समझनार जीवनाला, या जीवनात पूर्ण मरून बघा" शेवटी जीवनानेही म्हणायला हवं की, "हा माणूस जगला खरा आणि हाच होता माणूस खरा"
Its Just My Word's

शब्द माझे!