संध्याकाळ !!

Started by श्री. प्रकाश साळवी, July 27, 2015, 04:48:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

संध्याकाळ
एक एकाकी संध्याकाळ,
बसलो होतो रेघोट्या ओढीत
सागर किनारी;
वाळूवर, आपल्या प्रेमाच्या;
सोबत तू नव्हतीस !
होत्या मात्र आठवणी
तरंगत सागराच्या लाटेवर.
फेसाळलेल्या लाटा
मंद मंद वारा
तुझ्या आठवणीच्या
कोसळती गारा
तुझ्या आठवणिंचे गलबत
हालत होते मनाच्या सागरात
सूर्यास्त काहीसा आतुर
धरतीच्या मिलनासाठी
तुझ्या आठवणी फक्त
माझ्यासाठी
श्री. प्रकाश साळवी
17-07-2015

मिलिंद कुंभारे