कलाम..

Started by Pravin Raghunath Kale, July 30, 2015, 05:55:52 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

कलामजी.....
----×----×----
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच दुःखद निधन झाले. त्यांना शब्दरूपी श्रध्दांजली वाहण्याचा केलेला प्रयत्न.....

आज कितीतरी आठवतील
कलाम तुमच्या आठवणी
नकळत अश्रू ओघळतील
प्रत्येक भारतीयाच्या मनी

छोट्याश्या खेड्यातून तुम्ही
राष्ट्रपती भवनापर्यत पोहचला
प्रत्येक तरूणाच्या मनात
स्वाभिमान तुम्ही जागवला

तरूणांचे दिशादर्शक होता
अनेकांचे आदर्श होता तुम्ही
तुमच्या प्रत्येक कृतीतून
खूप काही शिकलो आम्ही

'मिसाईल मॅन' बनून
नवीन क्रांती तुम्ही घडवली
प्रत्येक भारतीयाच्या मनात
महासत्तेची स्वप्ने पेरली

देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही
अहोरात्र झटत आला
तिरंगा हा भारताचा
तुम्ही जगामध्ये फडकवला

कोसळला जरी देह तुमचा
तशाच आहेत आमच्या भावना
तुमचा प्रत्येक शब्दही आज
बनला आमच्यासाठी प्रेरणा

सोबत घेऊन साथ
तुमच्या असंख्य शब्दांची
लढू लढाई आम्ही
देशाच्या नवनिर्माणाची

महासत्तेच तुमचं स्वप्न
प्रत्यक्षात आम्ही आणू
तुमच्या स्वप्नांची पूर्तता
हेच आमचं ध्येय मानू  ...
----×----×----
कवी प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
Www.facebook.com/kalepravinr
pravinkalemy.blogspot.in
----×----×----
कृपया कविता फाॅरवर्ड करायची असल्यास कवीच्या नावासह फाॅरवर्ड करा.