गृरुकृपा

Started by sachinikam, July 31, 2015, 01:09:52 PM

Previous topic - Next topic

sachinikam

गृरुकृपा

पहिला हुंकार जणू प्रणव ओंकार
शिकविला सदाचार बिंबविले संस्कार
बिकट समयी दिली मायेची साउली
प्रथम वंदन गुरु माऊली

पहिल पाऊल जणू यशाची चाहूल
धीर प्रोत्साहन शाब्बासकीची थाप
पथावर अंधाऱ्या बनले कंदील
द्वितीयं नमन गुरु वडील

बुद्धीला चालके केले विचारांना बोलके
विज्ञानातून मिटवले अज्ञानाचे गलके
आयुष्याच्या वळणावर बनले मार्गदर्शक
तृतीय प्रणाम गुरु शिक्षक

विचारांची ठेव दाखविला अंतरंगातील देव
सद्सदविवेक नीतिमत्ता नि विद्वत्ता
घडले घडवेले प्रेरणेतून संत
शतश: नमन गुरु ग्रंथ

जाहली मजवर कृपा गुरूची
सौभाग्य माझे
जाहली सुलभ
वाटचाल पुढची.

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी : सचिन निकम
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com