बहर ना…… तू जरा… बहर ना ……

Started by शितल, July 31, 2015, 10:51:03 PM

Previous topic - Next topic

शितल

विसरता विसरले दुःखं ते मनाचे
विचार ते असे काही सोडून जीवनाचे
पुन्हा नवा श्वास हा, घे तू ही जरासा
बहर ना......  तू जरा...  बहर ना ......

लागली गोडी अन ध्यास हा लागला
उमलली कळी नवी, जीव हा गुंतला
गंधुनी फुलात त्या, उमल तू ही जरासे
बहर ना......  तू जरा...  बहर ना ......

सावरता सावरले पाखरू ते उडणारे
कधी इथे-कधी तिथे, धुंद बागडणारे
धरूनीया हात हाती, विहर तू ही जरासे
बहर ना......  तू जरा...  बहर ना ......


शितल ......