येरे येरे पावसा...

Started by गणेश म. तायडे, August 01, 2015, 07:48:32 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


येरे येरे पावसा
तुला राग कसला?
जमीन गेली आटून
आयुष्य गेले फाटुन
शेतकऱ्यांचा बळी
तुला का आवडी?
राबतो बिचारा
करूनी संसारा
पेरतो बियाणे
घाम तया गाळून
करी तु उध्वस्त
स्वप्नं त्यांची
येरे येरे पावसा
तुला राग कसला?
नको मुसळधार
बरस थेंब थेंब
मरणाऱ्या पिकांना
पाज गंगाजळ
नको होऊस काळ
जिवन अनमोल
आतूरले हे मन
तुझ्या आगमनास
देवा परी पुजा
करी शेतकरी
मागणी काहीच ना
बरस फक्त शेतावरी
येरे येरे पावसा
तुला राग कसला?

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com