हवी आहे साथ

Started by Vedanti, August 01, 2015, 02:29:50 PM

Previous topic - Next topic

Vedanti

सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकाची ,
त्यासाठी पुस्तकाला हवी साथ  ज्ञानाची...

निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
त्यासाठी संतांना हवी साथ संस्कारांची...

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची ...
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची ...

सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय  जीवनाची।।१।।

तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
त्यासाठी सूर्याला हवी साथ  प्रकाशाची...

सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
त्यासाठी फुलाला हवी साथ सुगंधाची ...

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची...
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची...

सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।

उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
त्यासाठी कलाकाराला हवी  साथ कलेची ...

शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
त्यासाठी हृदयाला हवी साथ शांत चित्ताची ...

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची  ...
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची  ...

स्मित हास्य आणि शांत मन यांच्या संगतीनेच ,
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय  जीवनाची।।३।।


वेदांती
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]