अशी आपली मैत्री..

Started by Shivshankar patil, August 02, 2015, 10:00:39 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

पूष्प मैञीचे असे उमलले
रंग छटा छायेच्या घेऊनी
निस्वार्थानी गंधाळलेले
श्वास अखेरचा होऊनी
कधी करूणेचा सागर
कधी डोक्यावरी अंबर
कधी पाठीशी उभा धिर मनोहर
कधी अल्लड मस्ती
कधी कुरबुर दोघांतली
कधी संत पाण्याचा झरा
कधी खळखळणारा वारा
कधी प्रितीचा मनोहर बंगला
तर कधी
पत्त्यासारखा ढासळणारा हवेतच
हृदयाने हृदयाला बांधलेली
रेशीम गाठ कायमची
सोबत असताना ही
   व नसतानाही होणारा भास..........