असे असेच जगायचे असतं..

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 23, 2015, 10:16:24 PM

Previous topic - Next topic
असे  असेच जगायचे असतं
कुणाच्या  डोळ्यात बघायचे असतं
डोळ्यांतल्या पाण्यातही भिजायचे असतं
दु:ख  त्यांचे समजायचे असतं

असे..असेच जगायचे असतं....

बोलत नाही बरेच चेहरे
ठेचाळलेले  जिकडे- तिकडे
जरा  जवळ  जाऊन हात खांद्यावर ठेवुन
घाबरायचे नाही...घाबरायचे नाही
जरासे का होईने आपणच त्यांचे आधारस्तंभ व्हायचे असतं....

असे असेच जगायचे असतं....
काही  नसतं अगदी जिवही नाही आपला
नाती अन माती एवढ्यांतच रहायचे असतं
कुणाच्यामुळे नाही तर आपल्यामुळे कुणाला आयुष्यं द्यायचे असतं.

येतात संकटे पडतो एकटे
होतो घामाघुम संपतात रस्ते सगळे
हरायचे फिरायचे नाही जगतात आपल्यामुळे काहीजन
तु  हे कधी विसरायचे नसते ....
तुला त्यांच्या सुखासाठीच मिळालाय हा जन्म
अरे  वेड्या त्यांच्याचसाठीच तर जगायचे असत.....

असे ...असेच जगायचे असतं....
अगदी ...असेच....

©प्रशांत डी.शिंदे....
दि.२३.०८.२०१५..