आई

Started by smadye, August 29, 2015, 12:38:50 AM

Previous topic - Next topic

smadye

आई

देवाने बनविली अशी एक बाई
बाळासाठी तीला नाव दिले आई'
असते ती खूप जन्माची पुण्याई
आईशिवाय दुसरे जागी दैवत नाही

तिची छाया, तिचे प्रेम
वात्सल्याची ती एक फ्रेम
मायेची पाखरण हे तिचे काम
बाळासाठी तिचे सारे प्रेम निष्काम

लेकरासाठी झटणे हे तिचे ध्येय
लेकरू घडविणे हे तिचे श्रेय
चिऊ मावू घास करुनी भरविते माय
लेकरासाठी जशी ती मवू मवू दुधावरची साय

जर आपण पडलो  तर काळजीने विचारी,
लागले कारे बाळा तुला?
पण आळस आणि भीती दिसली,
तर कठोर होवुनी म्हणे, आले पाहिजे सारे तुला

आईला धरणीची द्यावी का उपमा
अपराध पोटात घालूनी देते ती जन्म नवा
मन त्या माउलिचे असते फार मोठे
एवढ्या मोठ्या आभाळाला तिच्यापुढे वाटे थिटे

भरारी घेण्यासाठी देते ती पंखाना शिकवण
संस्कार, शिक्षण आणि मायेची सतत करी उधळण
बाळ झाला मोठा, घेई भरारी उंच आकाशात
आई मात्र बाबासोबत बसते घरट्यात बाळाला न्याहाळत

बाळ होई मोठा, रमे अपुल्या विश्वात
वेळ देवू न शके अपुल्या कामात
पण समजूतदार मात्र आई असते,
आईसाठी प्रेम आहे ह्याची जाणीव मात्र तीला एकटीला असते

बाळाला जपत, अपुले विश्व विणताना
तिलासुद्धा आपल्या मायबापापासून दूर राहावे लागते
आज बाळाला भरारी घेताना,
तीला ह्याची आठवण प्रकर्षाने होते

प्रत्येकाच्या जगण्याची रीत हे अशीच चालणार
मुले मोठी झाली कि ती भरारी मारणार
बछडयाची प्रगती बघत, तिचे प्रेम फुलणार
वात्सल्याचा वर्षाव सतत होत रहाणार

आई तुझी मी किती गाऊ थोरवी
आई तू प्रेमाची आहेस एक ओवी
उंच भरारी मारताना जावे लागते दुरी,
पण शपथ घेवूनी सांगतो, आई तू सदैव माझ्या अंतरी
म्हणुनी थोर ऐसे सांगती
आई - स्वामी तिन्ही जगाचा तुझ्याविना भिकारी


          सौ सुप्रिया समीर मडये