फुलोरा

Started by शिवाजी सांगळे, September 01, 2015, 05:11:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फुलोरा

आसुसलेे निल आभाळ
भेटण्या आतुर धरणीला,
धुंद सुगंधीत प्राजक्त
आकृष्टतो आभाळाला!

मोहक रूप, ना गंध
आकर्षण गुलमोहराला,
प्रेमाळलेला बवरा तो
दाहक ग्रीष्म पाघळला!

रातराणी फुलवुन देती
सुगंध दरवळ वा-याला,
बहर तसाची येतसे
गुंफुन शब्द काव्याला!

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९