कुणाची तरी सोबत हवी असते

Started by nirmala., December 16, 2009, 12:03:12 PM

Previous topic - Next topic

nirmala.

कुणाची तरी सोबत हवी असते
आपल्या  एकाकी विश्वात  या
कुणाची तरी साथ हवी असते.

कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे
अडखळनार्या  पावलांना  कितपत स्वताच सावरायचे
जळ फळीत ते उन्हाचे झोके
कितपत एकट्यानेच झेलायचे
आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला
कितपत केवळ अपेक्षेने  स्वप्नात पहायचे
वास्तव कधी त्याचे होईल का ?
स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे
सत्यात कधी उतरेल का
आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे
त्या हि संपत चाल्यात आता
पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे

                            निर्मला.............. :)

gaurig


Prasad Chindarkar

कुणाची तरी सोबत हवी असते
.........आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपल्या  एकाकी विश्वात  या
कुणाची तरी साथ हवी असते.

कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे
अडखळनार्या  पावलांना  कितपत स्वताच सावरायचे
जळ फळीत ते उन्हाचे झोके
कितपत एकट्यानेच झेलायचे
..........अशा वेळी हवी असते कोणाचीतरी साथ
              पुढे चाल म्हणणारा आश्वासक हात

आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला
कितपत केवळ अपेक्षेने  स्वप्नात पहायचे
वास्तव कधी त्याचे होईल का ?
स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे
सत्यात कधी उतरेल का
आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे
त्या हि संपत चाल्यात आता
पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे
..........खरच! अशा सोबतीविना अवघे आयष्यच उणे..........

mohan3968

Khupach chaan kavita aahe

gooooooood yaaaaaaaaar nirmala

santoshi.world