पुलं उवाच........परप्रांतीयांविषयी

Started by gaurig, February 09, 2010, 11:01:33 AM

Previous topic - Next topic

gaurig

                                                 परप्रांतीयांविषयी

प्रांत म्हणजे काही ' रेव्हेन्यू ' खात्यातल्या अधिका - यांच्या सोईसाठी केलेले त

ुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोप-यात राहणायाला आपल्या राज्यकर्त्या अधिकायांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा , जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही , तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी , यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसया प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाया लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर , डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही , हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे.

शेवटी दुसयाची वेदना काय आहे , तो कां ओरडतो आहे , चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं , हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं , यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणूस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल , याचा विचार आणि आचार केला , तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे.

देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत , ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील , तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता , प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत , याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!

(' रेडिओवरील भाषणे ' या पुस्तकातील ' संकुचित प्रांतीयतेचे धोके! ' या भाषणातून)