बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

vandana

Is very  good activity this poem is not found any were ..................
younger or older person is really  very good activity.

anandjoshiforyou

हा फार उत्तम संग्रह आहे... अभिनंदन!!
मला एक कविता हवी आहे.. कुणाकडे असल्यास कळवणे..
कवीचे नाव माहित नाही पण कवितेचे नाव "मावळत्या सूर्याप्रत" आहे..
वाट पाहतोय...

आनंद

:) ... विजेंद्र ढगे ... :)


कणा - कुसुमागज

[/b][/size][/font]
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले , केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहन
गंगामाई पाहणीआली गेली घरटात राहन

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत  नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली

भिंत खचली, चूल विझली,  होते नव्हते  गेले
प्रसाद महणुन पाप्न्यामध्ये  पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सरआता लढतो आहे
चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत  बांधतोआहे

खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठे वून फक लढ म्हणा!
-जबरदस्त कविता-

:) ... विजेंद्र ढगे ... :)




हि कविता भा. रा. तांबे ह्याची आहे

खास तुझ्यासाठी

....बस दुवा में याद रखना ....


-विजेंद्र ढगे-

:) ... विजेंद्र ढगे ... :)

#134
दुपार


माथ्यावरती उन्हे चढावी
पावलांत सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या

डोँगर व्हावे पेँगुळलेले
पोफळबागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती
तहानलेल्या मैना याव्या

लुकलुकणारे गोल कवडसे
निँबाच्या छायेत बसावे
खारीचे बावरे जोडपे
बकुळीखाली क्षणिक दिसावे

कुरणाच्या हिरवळीत ओल्या
ऊनही हिरवे होऊन जावे
कुठे कधीचे नांगरलेले
शेत पावसासाठी झुरावे .
- सदानंद रेगे


Vijendra Dhage

:) ... विजेंद्र ढगे ... :)

आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेल गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?

आई खरच काय असते ,

लंगड्याचा पाय असते , वासराची गाय असते
दुधावरची साय असते , लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही .

- फ. मु. शिंदे

:) ... विजेंद्र ढगे ... :)

माझी कन्या

गाई  पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
'अहा ! आली ही पहा, भिकारीण!'

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा 'समय' तपस्व्याचा,
'भोग' भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा 'स्वर्ग' की, कुणाचा,
'मुकुट' कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

'यशःश्री' वा ही कुणा महात्म्याची,
'धार' कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !


chintaman


बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

चल सालस पण धरुनी निखालस बोला खोट्या बोलू नको
अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरु नको ||

नास्तिक पणात शिरुनि जनाचा, बोल आपणा घेऊ नको
भली भलाई करा काही, पण अपधर्मंमार्गी शिरू नको ||

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नको
बुडवाया दुसरयाचा ठेवा, करुनी हेवा झटू नको ||

उगाच निंदा स्तुति कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची मैत्री करू नको ||

कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको
आल्या अतिथि मुठभर द्याया मागे पुढती पहु नको ||

हिमायतीच्या बले गरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेवू नको ||

सुविचारा कतरू नको , सतसंगा अंतरु नको
द्वैताला अनुसरू नको , हरिभजना विसरु नको ||

संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||
[ही कविता फटका या काव्य प्रकारात येते .
हा फटका अनंत फंदी यांचा आहे]

shraddharn

आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे -
बालकवी