उगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.

Started by futsal25, September 01, 2010, 05:02:11 PM

Previous topic - Next topic

futsal25

कविता आशावादी/निराशावादी या वादात कोणी पडू नये, ती कवीची कल्पना/सत्य परीस्थिती आहे. ती तटस्थपणे पाहावी. कवितेला एक कलाकृति म्हणून घ्यावे, उगाच कवीला आशावादाचे डोस पाजू नये.

जीवन म्हणजे सुख-दु:ख यांचा मिलाफ, पण नीट बघता  असे आढळून येते की सुखापेक्ष दु:खाचे प्रमाण अधिक असते. सामान्यजन सुख चांगले आणि दु:ख वाईट अशी सर्वसाधारण वर्गवारी करतात. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे चांगले/वाईट असे वर्गिकरण केले की मग सगळेच संदर्भ बदलतात.
अनेक जणांना दु:खाचे आघात पचवता न आल्याने ते जीवन संपवण्याचा दुदैवी निर्णय घेतात.
तसे बघितले तर दु:ख अत्यंत जरुरीचे आहे. आश्चर्य वाटताय ना?? पण कल्पना करा की जगातील दु:खचं नाहीसे झाले, तर आपणास सुखाचे/आनंदाचे महत्वचं कळणार नाही. दु:ख आहे म्हणून सुख आहे. उलट  दु:खामूळे सुखाचे महत्व वाढले आहे.

दु:खामुळेच अनेक कलाकारांच्या हातून श्रेष्ठ कलाक्रुति तयार झाल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आग्राचा 'ताजमहाल'. शहाजहानला मुमताजमहल हीचा विरह सहन न झाल्यामुळे, तिच्या चिरंतन स्म्रुतीसाठी जे स्मारक बांधण्यात आले ते म्हणजे 'ताजमहाल'.
अनेक कवींनी, शायरांनी दु:ख, दर्द, वेदना यांच्यावर असंख्य रचना केल्या आणि अमर झाले.
वानगी दाखल एक  उदाहरण देत आहे.


हमपे दु:खके पर्बत टुटे तो हमने शेर दो-चार कहे
उनमे क्या गुजरी होगी जिन्होने शेर हजार कहे


तेव्हा दु:खाला, वेदनेला डोईजड होऊ न देता, त्यावर विजिगीषु व्रुत्तीने मात करणे अधिक श्रेयसकर.
हे मान्य की असे सल्ले देणे सोपे आहे, हे ही मान्य की दु:ख अपार आहे व ते झेलत जीवन व्यतित करणे अत्यंत कठीण आहे. पण असे करणारे आपण या जगात एकटेच नाहीत. अनेक संत, महात्मे, राजे-महाराजे यांनाही दु:ख टाळता आले नाही. प्रभु श्रीरामांनाही जेथे १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला, तेथे आपली काय तह्रा.

आपल्या आजु-बाजुला असे अनेक आदर्श आहेत ज्यांनी दु:खावर, वेदनेवर यशस्वीरीत्या मात केली आहे. तेव्हा दु:खाला शरण न जाता दु:खावर स्वार होऊया, आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया.


- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :(  :) ;)  ;D


मूळ लेख येथे वाचावा.
http://sourabhparanjape.blogspot.com/2010/03/blog-post_19.html