Author Topic: शुभेच्छा पोलिसांना  (Read 1011 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
शुभेच्छा पोलिसांना
« on: November 12, 2015, 12:43:24 AM »
शुभेच्छा पोलिसांना

हौशे, नवशे, गवशे आणि भटके 
कमतरता नसते कधी शहराला,
नजर असते ठेवायची सा-यांवर
नसतो आराम कधी पोलिसाला ।।

कुणी असतं नाक्यावर जोडीनं
तर कुणी जोडीदारासह गाडीनं,
आपण असता सणाला संगतीनं
असतात तंग पोलिस गस्तीनं ।।

सणासुदि सुद्धा कर्तव्यास हजर
कुटुंबाचीही अव्हेरली जाते इच्छा,
सहन करता आमच्यासाठी सारं
धन्यवाद मानावेत ही मनी इच्छा ।।

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा।।

© शिवाजी सांगळे 🎭
« Last Edit: November 13, 2015, 07:37:43 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता