Author Topic: आनंदाचे क्षण  (Read 3334 times)

Offline yogita ghumare

 • Newbie
 • *
 • Posts: 11
आनंदाचे क्षण
« on: May 22, 2017, 09:07:49 PM »
कुठे हरवले कुठे उडाले ते क्षण आनंदाचे
नटखट मैत्रीचे आणि रुसत्या रागावत्या चेहऱ्यांचे

पूर्ण जगात एक वेगळीच यारी निभावणारे
कुठे हरवले। कुठे उडाले ते क्षण आनंदाचे
त्या आगळ्यावेगळ्या यारीचे   
त्या क्षणापूरत्या भांडणाचे
सगळ्यांना डोळे बंद करून मदत करण्याचे
कुठे हरवले ते क्षण आनंदाचे

शाळेच्या दिवसात सुट्टी शोधणारे
वेकेशनच्या दिवसात शाळा शोधणारे
ते क्षण आमच्या यारीचे
 कुठे हरवले ते क्षण आनंदाचे

आता असे वाटते की ठेवले असते जपून ते क्षण
आमच्या  हसण्याखेळण्याचे आमच्या मैत्रीचे
माहीत नाही कधी परत येतील ते क्षण आनंदाचे .….

                                 - योगिता घुमरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline जयवंत रावल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 186
 • Gender: Male
 • JAYWANT RAWAL
  • स्वरगंगेच्या काठावरती
Re: आनंदाचे क्षण
« Reply #1 on: May 23, 2017, 08:56:03 AM »
खुपच छान
जयवंत रावल
http://ranksheet.com/Profiles/Jaywant

Offline yogita ghumare

 • Newbie
 • *
 • Posts: 11
Re: आनंदाचे क्षण
« Reply #2 on: May 23, 2017, 07:32:42 PM »
thank you so much

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: आनंदाचे क्षण
« Reply #3 on: October 15, 2017, 01:52:51 PM »
chan.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]