Author Topic: जीवनवाट  (Read 1113 times)

Offline कदम.के.एल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 485
जीवनवाट
« on: October 14, 2017, 03:56:59 PM »

जीवनवाट

जीवनवाट होती खुप लांबच माझी
या वाटेवरती मला एक साथ तुझी ...

ओझे आयुष्याचे मी वागवत चालतो
तुझ्या मुळेच प्रवासी शक्तीचा संचार होतो

वाटसरू मला खूप भेटले वाटेवरती
तुझ्या मुळे आलो मी माझ्या किना-यावरती

झेलल्या खुप झळा मी जीवनवाटेवरती
सावली पडलेली तुझी माझ्या माथ्यावरती

भेट तुझी माझी झाली एका वळणावरती
आयुष्याला सोबत झाली ती जीवनवाटेवरती
« Last Edit: January 07, 2018, 12:01:38 AM by कदम.के.एल. »
©कदम.के.एल.

Marathi Kavita : मराठी कविता