Author Topic: मैत्रीची फुटपट्टी  (Read 1546 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,328
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मैत्रीची फुटपट्टी
« on: December 26, 2017, 08:23:56 PM »
मैत्रीची फुटपट्टी

खरंच मैत्रीचा कालावधी
कसा हो मोजला जातो?
याचाच नेहमी गुढ प्रश्न
मलाच का पडत रहातो !

असतेच का अशी फुटपट्टी
एखादी मैत्री मोजण्याची,
तरीसुद्धा असते ना स्पर्धा
आभासी नाती तोलण्याची !

येतात अन् जातात कित्येक
काही ''अबोल" बोलतात,
आपल्याच मुखातून काही
स्वतःची किम्मत करतात !

पडून गळ्यात का कधी
मैत्री हक्काची होते ?
आदर, सम्मानाची खऱ्या
मैत्रीत कदरच होते !

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता