Author Topic: पाऊस  (Read 449 times)

Offline Sunandan13

  • Newbie
  • *
  • Posts: 1
पाऊस
« on: April 05, 2019, 05:37:31 PM »
पाऊस :)

रिमझिम पाऊस बरसला,

बघुनी मलाच हसला,

मी म्हटलं का हसतोस ?

म्हणे मी एवढा बरसूनही,

तू कोरडाच राहिलास ?


मीही त्याला पाहून हसलो,

बघून त्यालाच म्हणालो,

म्हटलं खरा कोरडा तर तू राहिलास,

एवढे साल विना मित्रांचा जगलास !

मी त्याला म्हणालो,

आनंदी मी राहतो, वेलींसवे मोहरतो,

सदा सुखी राहतो, तू असा जगतोस ?

मित्रांसवे बागडतो, त्यांनाच पाहून रमतो,

दु:खे एकमेकांची वाटतो, तू असा जगतोस ?


पुन्हा पाऊस हसला,

मला बघुन म्हणाला,

तुझं आपलं बरं आहे,

एवढे जिवलग मित्र आहेत !

आणि खरा कोरडा तर मीच आहे.

Marathi Kavita : मराठी कविता