Author Topic: ईवल्या ईवल्याशा  (Read 1100 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
ईवल्या ईवल्याशा
« on: February 23, 2017, 11:09:59 AM »
इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचें
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी

निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे
झुळुझुळु पाट
निळ्यानिळ्या डोंगरांत
निळीनिळी दरी

चांदीच्या झाडांना
सोन्याची पानें
सोनेरी मैनेचें
सोनेरी गाणें
सोन्याची केळीं
सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला
सोन्याची कैरी

देवाच्या घरात
गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची
अंथरली गादी
चांदण्याची हंडी
चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा
मोठा लावला वरी


चित्रपट: देवबाप्पा
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: पु. ल. देशपांडे
स्वर: आशा भोसले.

« Last Edit: February 23, 2017, 11:11:17 AM by कुमुद »

Marathi Kavita : मराठी कविता