Author Topic: तारे  (Read 752 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
तारे
« on: June 26, 2017, 09:55:02 PM »
गिरगिरटी वाऱ्यावरती
हसणारी ती फुले
पंखात बळ घेऊन
उंच उडणारी मुले.

नाजुक साजुक झोक्यावरती
झुलणारे झुले,
उंच उंच किनारे
झोक्यासाठी खुले.

झुळ झुळ नाल्या वरूनी
प्रेम बरसणारे झरे,
मनात गुदगुदणारे
डोळ्यातले तारे.

चिंब चिंब ओठांशी
कुजबुजणारे वारे,
गारव्यात उमलणारे
अंगातले शहारे.

मखमलीत झुंज
करणारे तुरे,
कुरणा वरती
चरणारी ती गुरे.

तुडवत रस्ता
 चालणारे हिरे,
मोडुन वहिवाट
उंच शिखराशी तोच फिरे.
Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,421
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तारे
« Reply #1 on: July 05, 2017, 01:51:17 PM »
 :) :) :)