Author Topic: बाळा झोप रे  (Read 588 times)

बाळा झोप रे
« on: August 13, 2017, 08:46:36 PM »
झोप रे बाळा, नविन पाळणा  मऊ मऊ गादी
सोनुल्या, झोप रे आजी गाते गाणी.

इवले इवले डोळे मिट रे आता,
झोका तुला देते, छोटीशी दिदी.

आली आली तुला रे झोप,
नको नको रडू, आई गाते अंगाई.

बाबा आले आता आवाज ऐकून,
हाताचा झुला बाबांनी केला.

बाबांच्या हातात आहे रे जादू
बाळ, गाढ झोपले आता हळूच पाळण्यात ठेवू.

Marathi Kavita : मराठी कविता