Author Topic: शिंपी दादा  (Read 831 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
शिंपी दादा
« on: October 13, 2017, 06:18:26 PM »

शिंपी दादा शिंपी दादा
कपडे माझे शिवून दे
कापड आणलं नव्या सुताचं
माप चांगले काढून घे ..

शिंपी दादा शिंपी दादा
कपडे माझे शिवून दे
नीटनेटका काढून गळा
बाहु पुर्ण लांबीची करून दे ...

शिंपी दादा शिंपी दादा
कपडे माझे शिवून दे
नीटनेटकी गुंडी लावून
काज्या मजबुत शिवून दे ...

शिंपी दादा शिंपी दादा
कपडे माझे शिवून दे
नीटनेटके पायजम्याचे माप घे
कंबरे पासून तळवे पायांचे झाकून दे ...

शिंपी दादा शिंपी दादा
कपडे माझे शिवून दे
कापड आणलं नव्या सुताचं
मजबुत धाग्यांनी विणून दे ...
« Last Edit: November 29, 2017, 06:54:34 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता