Author Topic: बालकविता: विमानाची डोकेदुखी  (Read 513 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 175
बालकविता: विमानाची डोकेदुखी

एके दिवशी विमानाची गंमत झाली भारी
उंच गेले आकाशात आली त्याला घेरी

अचानक विमानाचे लागले डोके दुखायला
तारांबळ उडाली एकच ठोके लागले चुकायला 

कुणी दिला बाम आणि कुणी दिली गोळी
विमानाचे डोके ऐकेना कुणाची आरोळी

आपला बंटी आजीसोबत विमानात होता बसला 
काय माहित विचार तो करत होता कसला?

आजीबाईच्या बटव्यातून कसली औषधी दिली
विमानाची डोकेदुखी लगेच बरी झाली 

सर्वाचा प्रवास मग अगदी सुखाचा झाला
आजी आणि बंटीचा जयजयकार सर्वांनी केला 
-राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४