Author Topic: मधमाशी  (Read 873 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
मधमाशी
« on: March 15, 2018, 12:17:40 PM »

मधमाशी मधमाशी घोंघावते फुलांवर
मकरंद गोळा करते,बांधून पोळ झाडांवर
मधमाशी मधमाशी घर बांधते फांदींवर
टांगून ठेवते मध,पोळात बादलीभर ...

मधमाशी मधमाशी समुहाने राहते
कुंभारमाशी कुंभारमाशी पोळ सर्वाना बांधते
गांधीलमाशी गांधीलमाशी मधाने तो भरते
मधमाशी मधमाशी मव्हळ करून राहते ...

मधमाशी मधमाशी फुलांवर फिरते
कण-कण मध फुलातून शोषून वेचते
रक्षकमाशी रक्षकमाशी रक्षण त्याचे करते
खवळलं जर कुणी त्यांना डसा डसा डसते ...
« Last Edit: March 15, 2018, 04:24:51 PM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता