Author Topic: मार्दव (ज्ञानदेवीतील दैवी गुण)  (Read 423 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
 :)
*****

मार्दव म्हणजे काय असते
मनाचे कोवळे नाव असते
नभातील ढगाप्रमाणे
शीतळ प्रेमळ होणे असते

डोळ्याला स्पर्शणारी
वायूची लहर असते
मंद लहरीत चमचमता
प्रेमाचा सागर असते

अंकुरणाऱ्या बीजास जी
वाट मातीतून करून देते
उठणाऱ्या शिशूच्या ते
डोळ्यातील मी पण असते

रुपणे खुपणे काय ते
तेही तया ठाऊक नसते
हवे हवेसे जगताला
सदा सर्वदा प्रिय असते

असे मन मवाळ केवळ
देवाचेच देणे असते
प्रभू पदाच्या स्वागताला
उघडलेले द्वार असते

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/