Author Topic: *** शिवभक्त ***  (Read 784 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 240
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** शिवभक्त ***
« on: February 19, 2018, 09:03:09 PM »

🚩🚩 *शिवभक्त* 🚩🚩

 *राजे...*
भगवा घेऊनी हातात,
ज्याचं सळसळतं रक्त..
शपथ घेऊन सांगतो राजे,
तोच तुमचा खरा शिवभक्त..!!

 *राजे...*
नुसतं नाव ऐकुनी तुमचं,
गर्वाने फुगते ज्याची छाती..
तोच पसरवतो सगळीकडे,
तुमच्या पराक्रमाची ख्याती..!!

 *राजे...*
जो शिवभक्तीसाठी जगतो,
अन् शिवभक्तीसाठी मरतो..
तुमची भव्य मूर्ती पाहुन,
फक्त तोच मुजरा करतो..!!

 *राजे...*
कसलाही भेदभाव न करता,
जो नेहमी शिवभक्तीत रमतो..
 *"जय शिवराय"* बोलण्यास,
तो भक्त कधीच ना दमतो..!!

 *राजे...*
शिवभक्ताची ही जात हाय,
मोडेल पण वाकणार नाय..
राजेंशिवाय इतरांपुढे हात,
जोडेल पण झुकणार नाय..!!

 *राजे...*
कर्तव्य असे की उरावी किर्ती,
हृदयात ज्याच्या वसे तुमची मुर्ती...
छाती जरी कठीण, काळीज ना सक्त...
राजे फक्त तोच खरा शिवभक्त...!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
 *सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा..*
🙏🏻🙏🏻🚩⛳🚩🙏🏻🙏🏻
 *जय शिवराय...*
   *जय भिमराय...*
-
🤴🏻 *©कवी धनराज होवाळ©* 🤴🏻
_कुंडल, जि. सांगली_
_मो. ९९७०६७९९४९_
🙏🏻🌹🚩🚩🤴🏻🚩🚩🌹🙏🏻

Marathi Kavita : मराठी कविता