Author Topic: जीवन हे ओवी  (Read 405 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जीवन हे ओवी
« on: November 01, 2015, 01:30:41 PM »
ज्ञानेशाची भिंत ठावूक न मला
योगाग्नी पेटला मांडयासाठी ||
ज्ञानेशाचा रेडा सांगू नका मला
मेलेला उठला सच्चिदानंद ||
गीतेची टीका ग्रंथ तोची निका
भावार्थ दीपिका चमत्कार ||
एका ओवी साठी एक जन्म घ्यावा
पुनःपुन्हा व्हावा संग ऐसा
अधिक मागणे नच अन्य काही
जीवन हे ओवी एक व्हावे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता