Author Topic: देवाच्या कारणे  (Read 431 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
देवाच्या कारणे
« on: November 05, 2015, 04:41:06 PM »
घडो हे जगणे
देवाच्या कारणे
बाकी देणे घेणे
उरो नये ||
देहाची वासना
ठेवली बांधून
संपले म्हणून
काम तिचे ||
मनाची या हाव
मनालाच ठाव
कळला उपाव
त्याचा आता ||
वाहियले फुल
जैसे प्रवाहात
देवाच्या दारात
तैसे मी पण ||
आता  तरंगणे
अथवा बुडणे
जगणे मरणे
सोपस्कार ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

   

Marathi Kavita : मराठी कविता