Author Topic: समर्थ महिमा  (Read 445 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
समर्थ महिमा
« on: November 09, 2015, 11:23:07 PM »
समर्थ महिमा

गुरू माऊली तू, थोर तुझी किर्ती
मनी वसे मुर्ती, श्री स्वामींची।।१।।

नामाचे महत्व, कळे त्वा स्मरता
त्रिभुवनी त्राता, तुच दाता।।२।।

हरविसी चिंता, नित्य तु भक्तांची
भिती ना कशाची, कुणासही।।३।।

आधार सर्वांना, सदैव सर्वत्र
भिवु नको मंत्र, त्वा दिलेला।४।।।

म्हणती तुजला, वटवृक्ष स्वामी
दारी तुज आम्ही, क्षमापार्थी।।५।।

होती क्लेष दूर, टेकविता माथा
पायी तव आता, मी शरण।।६।।

अक्कलकोट जे, स्थान श्रेष्ठ फार
भक्तां ठायी थोर, सर्वश्रुत।।७।। 

महिमा स्वामींचा, वर्णावा मी कीती
दिली त्यांनी मती, म्हणे शिवा।।८।।

© शिवाजी सांगळे 🎭
« Last Edit: November 09, 2015, 11:34:08 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता