Author Topic: गणपती बाप्पा मोरया  (Read 579 times)

गणपती बाप्पा मोरया
« on: September 03, 2017, 09:37:21 AM »
घरी आले आपल्या गणपतीबाप्पा
चला या आरती करु.
मोदक त्यांच्या  आवडीचे पटपट बनवु या
प्रसाद सगळ्यांना देऊ या
गणपत्तीबाप्पा मोरया चला सगळे बोलू या

दिवस गेले पटापट बाप्पाच्या सोबत
आनंदाने घर आमचे सजले
आता चालले गणपत्तीबाप्पा
आम्हा येईल रडू, बाप्पा तुम्ही नका जाऊ

पण पुढच्या वर्षी येण्यासाठी ते जाणार
मग गणपत्तीबाप्पा मोरया मंगलमूर्ती  मोरया बोलूया
त्यांना निरोप देऊ या.

Marathi Kavita : मराठी कविता