Author Topic: जगन्माता  (Read 416 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
जगन्माता
« on: September 28, 2017, 07:49:02 PM »
       जगन्माता

आयाबायांनी जन्म दिला
वाट दाविली सर्व जना
आयुष्याच्या वाटेवर परि
 नाही त्यांच्या पाऊलखुणा

तृषार्त राहून तोषलेस तू
शोषित होऊन पोसलेस तू
त्याग करुनि सर्वस्वाचा
आयुष्यभर सोसलेस तू

जाया तू, माया तू
सती तू, रती तू
देवी, गणिका, दुहिता तू
परि,अंती जगन्माता तू

पावक तू, दाहक तू
अनिष्ट दुष्ट संहारक तू
पतित पावन उद्धारक तू
सर्व मंगलकारक तू   

वगळता तव जगती जननी
अवशेष मात्र शून्य राहतो
कृतार्थतेने प्रिये कामिनी
कुसुमांजली तुज अर्पण करतो

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता