Author Topic: देव शोधणे माझे  (Read 734 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
देव शोधणे माझे
« on: October 08, 2017, 08:56:23 PM »
शोधणे माझे
**********

लागली आच 
शब्दांनी माय
वाचविण्याचे 
सरले उपाय

आता लपवू
कुठे स्वत:ला
सारा शून्याचा
सुटे गुंडाळा

धावतो अहं
जरी कासावीस
जमीन उरली
नाही पायास

वाजतो चाबूक
वळ न उमटे
मिटता डोळे
लख्ख दिसते

शोधता काही
हरवून गेले
शोधणे माझे
मीच पहिले

पेटता जाणीव
अंगण भरले
माझे मी पण
माझ्यात वेगळे 

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot,in


Marathi Kavita : मराठी कविता